Sunday, September 28, 2008

बंडूचे व्याकरण



बंडू शाळेतून घरी आला तोच रडत रडत आणि गाल चोळत.
बाबा : बंड्या रडतोयस का?
बंडू : गुरुजींनी मारलं.
बाबा : हं, म्हणजे तूच नक्की काही तरी खोडी केली असणार.
बंडू : छे हो बाबा, उलटं मी उत्तर बरोबर दिलं म्हणून गुरुजी चिडले.
बाबा : म्हणजे रे काय?
बंडू : म्हणजे झालं असं, गुरुजींनी आज आम्हाला व्याकरणातले लिंग भेद शिकवले. मग मला म्हणाले, बंड्या तिन्ही लिंगातील एक एक उदाहरण दे पाहू. आणि मी क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं. तो बाक, ती शाळा आणि ते गुरुजी! (ठाप्प)

No comments: