Friday, August 26, 2011

व्याख्याहुशार पत्नी : अशी व्यक्ती जी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करते की, नवऱ्याला दुसरी बाई परवडूच नये! 

मिस्टर बीनमिस्टर बीनला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्याच दिवशी तो रात्री उशिरापर्यंत काम करत होता. त्याचा बॉस त्याच्यावर खूप खूश झाला आणि विचारलं आज दिवसभर तू काय  काम केलंस?? 

मिस्टर बीन : कीबोर्डवरची अक्षरं क्रमाने नव्हती..ती क्रमाने लावली.. 

कारणशिक्षक   : शहामृगाची मान लांब का असते? 


विद्यार्थी : कारण त्याचं डोकं आणि शरीर याच्यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे त्यांना जोडण्यासाठी त्याची मान पण लांब असते. 

Thursday, August 25, 2011

ओळख


पती : आज आपल्या चिरंजीवांनी माझ्या खिशातून काही पैसे चोरलेले दिसताहेत....

पत्नी : कशाला त्याच्यावर आळ घेता उगाच? मी तुमच्या खिशात हात घातला नसेल हे कशावरून?

पती : अगं, खिशात अजून काही पैसे शिल्लक आहेत.. 

फिल्मसनी : अरे, काल एक पिक्चर पाहिला. पण त्यात ना सीन्स होते ना डायलॉग्ज. असं कसं असेल? 


बन्नी : काय सांगतोस, काय नाव होतं त्या फिल्मचं?

सन्नी : नो डिस्क. 

वर्क प्रोफाइल
एक दारुडा रस्त्यातून जात असतो. समोरून एक माणूस येतो.


दारुडा : जा, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये!

माणूस : मी तुझा नोकर नाही!

दारुडा : मग कोण आहेस?

माणूस : मी पायलट आहे!

दारुडा : मग जा, माझ्यासाठी विमान घेऊन ये!